लोणंद शहर येथे पुन्हा कोरोना रुग्ण आढळून आल्याने लोणंद शहर पुढील पाच दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.दि.03 रोजी लोणंद येथे 40 वर्षीय कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले असल्याने व त्या रुग्णाचा अनेक ठिकाणी वावर झाल्याने अनेक कुटुंबे हाय रिस्क असून त्यांना काॅरंटाईन करण्यात आले आहे. तसेच आजपासून किराणा व्यापारी, कापड व्यापारी, भाजीपाला व्यापारी, व इतर दुकानदार माल विक्रेते यांच्याशी संपर्क करून व बैठक घेऊन लोणंद शहर हे पुढील पाच दिवसांसाठी म्हणजेच गुरुवार दिनांक नऊ जुलै पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्यात येईल. अत्यावश्यक अत्यावश्यक सेवेत हॉस्पिटल व मेडिकल हेच सुरू राहतील अशी माहिती लोणंद नगरपंचायत चे नगराध्यक्ष श्री. सचिन शेळके यांनी दिली तसेच नागरिकांनी या निर्णयाचे पालन करून सहकार्य करावे तसेच प्रत्येकाने आपली स्वतःची कुटुंबाची व सभोवतालच्या परिसराची काळजी घ्यावी व शासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्ष श्री. सचिन शेळके यांनी केले आहे.