महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (फलटण) : प्रतापसिंह भोसले
पिंपळगांव बाजार समितीत कांद्याने चार हजार पंचवीस रुपये प्रतिक्विंटल असा आकर्षक भाव खाल्ला असताना केंद्र शासनाच्या डोळ्यांत बाब खूपलेली दिसते.
बांगलादेशच्या सीमेवर व मुंबईच्या जे.एन.पी.टी होणारी निर्यात तुर्त थांबवलेली आहे. मुंबई पोर्ट मधे ५०० ते ६०० कंटेनर पोहोचलेले असताना गेल्या दोन दिवसांपासून हे कंटेनर थांबविलेले आहेत. या ५०० कंटेनर मधे ५० कोटींचा साधारण १८००० मेट्रिक टन कांदा असुन बन्दरावर निर्याती विना थांबविण्यात आलेला आहे. त्यामुळे १८ हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीअभावी खोळंबलेला आहे.
कांद्याची निर्यात रोखून दर आवाक्यात ठेवण्याचा निर्णय केंद्र शासन घेण्याच्या पावित्र्यात असल्याने त्याचा दबाव दुपारच्या सत्रात कांदा लिलावावर झाला. तासाभरात एक हजार रुपयांनी दर कोसळले असुन तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत घसरले. केंद्राने कांदा निर्याती बाबत शेतकरी विरोधी धोरण घेतल्यास ग्रामीण अर्थ व्यवस्था पुर्णत: ठप्प होण्याची शक्यता शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. शासनाच्या या भूमिकने शेतकर्यांमधे संतापाची तीव्र लाट उसळलेली आहे. त्या मुळे शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.