पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घ्यावा मुख्याधिकारी यांचे आवाहन
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :महाबळेश्वर
दि. ०८-०९ कोविड-१९ (साथीचा रोग) सर्वत्र पसरल्याने व टाळेबंदीमध्ये(Lockdown) पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झालेला आहे.केंद्र शासनाच्या वतीने शहरातील सर्व फेरीवाला/फळविक्रेत्यांना लॉकडाऊन काळात मोडकळीस आलेल्या पथविक्रेत्याचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्या करिता महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजने अंतर्गत १० हजार रुपये खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे,याकरिता पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले.
लॉकडाऊन काळात मोडकळीस आलेल्या पथविक्रेत्यांना त्यांच्या व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पथविक्रेत्यांना विशेष सूक्ष्म पतपुरवठा करण्याच्या निर्णय घेतलेला असून बँकेच्या सहाय्याने विना तारण १० हजार रु.खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.यामध्ये भाज्या,फळे,तयार खाद्यपदार्थ,चहा,भजी-वडापाव,अंडी,कापड,वस्त्र,चप्पल,पुस्तके,स्टेशनरी इत्यादी विक्रेत्यांचा समावेश आहे.तसेच केशकर्तनालय,चर्मकार,पानदुकान,कपडे धुण्याची दुकान यांचाही समावेश असून योजनेचा लाभ घेण्यासाठी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेने स्वतंत्र कक्ष सुरु केला आहे.त्याद्वारे पथविक्रेत्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरु आहे ही योजना दि.२४ मार्च २०२० रोजी व त्यापूर्वी पथविक्री करीत असलेल्या सर्व पथ विक्रेत्यांना लागू आहे.
आज पर्यंत १५३ शहरी फेरीवाल्यांनी अर्ज केले होते.त्यापैकी ७० पात्र लाभार्थींचे कर्ज प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र शाखा महाबळेश्वर यांनी मंजूर करून त्यांचे बँक खातेवर प्रत्येकी १० हजार रुपये खात्यात वर्ग करण्यात आलेली आहे.कर्जाची नियमित परतफेड केल्यास ७% व्याजात सूट व पुढे मोठे भांडवली कर्ज देण्यात येईल.तसेच लाभार्थीने डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक देखील दिले जाणार आहे.