खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीला यश
महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी / गणेश पवार:
सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे पार्श्वभूमी रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या दिसत आहे त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आयसोलेशन सेंटर उभी केली जात आहेत या सेंटर मधील रुग्णांसाठी १५ व्या वित्त आयोगातून त्वरीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्याचे आदेश द्यावेत अशा पद्धतीचे पत्राद्वारे मागणी केली होती त्यास सातारा जिल्हा परिषदेने अनुमती दिली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक गोडा यांनी तसे आदेश वजा पत्र जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदीस परवानगी दिल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना याचा उपयोग होईल अशा आशयाचं पत्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्फत भाजपचे शिष्टमंडळ यांनी दिले होते .याबाबत मुख्याधिकारी यांनी जिल्हास्तरावरून या गोष्टीसाठी विलंब होऊ शकतो म्हणून गटविकास अधिकारी यांच्या मार्फतच तातडीने निर्णय घ्यावेत व तशा पद्धतीचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे मागून घेऊन त्यास परवानगी द्यावी असे या पत्रामध्ये आदेश दिले आहेत यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना याचा नक्की फायदा होईल सदरची मशीन गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस या साइटवरून खरेदी करता येईल सदर चे प्रस्ताव ग्रामपंचायतीने तातडीने दाखल करून त्यास गटविकास अधिकारी यांच्याकडून मंजुरी घेऊन मशीन खरेदी करण्यात यावे अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी दिली आहे तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्राची जिल्हा परिषदेने दखल घेतल्याबद्दल व तातडीने कारवाई केल्याबद्दल खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.