जननी सुरक्षा योजना कागदावरच; गर्भवतींना सोसाव्या लागतायत मरणयातना
सातारा : गोरगरिब, दीनदुबळ्या, सामान्य जनतेसाठी जिल्हा रुग्णालय म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल हे एक आरोग्य मंदिर आहे. परंतु अलीकडच्या काळात रुग्णालयात चित्रविचित्र प्रकार घडत असल्यामुळे सिव्हिल चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात भर म्हणून गर्भवती महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सातारा जिल्हा रुग्णालय संपूर्ण जिल्ह्याचे केंद्रस्थान आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी याठिकाणी येतात. परंतु त्यांच्यावर होणारे उपचार आणि त्यामधील सुधारणा हा चर्चेचा विषय आहे. कारण रुग्णांचे नातेवाईक आणि उपचार करणारे डॉक्टर यांच्यामध्ये कोणताही सुसंवाद साधला जात नाही. कारण डाॅक्टरांच्या राऊंड वेळी नातेवाईकांना बाहेर काढले जाते.त्यामुळे आपल्या रुग्णांवर काय उपचार होत आहे.हा प्रश्न डिस्चार्ज होईपर्यंत काही नातेवाईकांना कळतच नाही. त्यासाठी डॉक्टर्स आणि नातेवाईक यांच्यात सुसंवाद निर्माण होणे काळाची गरज आहे.
शासनाने गर्भवती महिलांच्या सुरक्षेसाठी जननी सुरक्षा योजना निर्माण केली.यामुळे गर्भवती महिलांना घरापासून रुग्णालय व पुन्हा घरापर्यंत मोफत सर्व सुविधा पुरवल्या जातात.गर्भवती महिला रुग्णालयात महिला दाखल झाल्यानंतर त्यांना योग्य. रितीने हातळले जात नाही. त्यांना योग्य रितीने मार्गदर्शन केल्यास त्यांच्या मनातील भिती कमी होण्यास मदत होईल.परंतु एखादा रुग्ण अॅडमीट झाला आहे. यांची माहितीच तेथील कर्मचाऱ्यांकडे तासोनतास नसते.
एखाद्या महिलेस त्रास होत असेल तर त्या महिलेची साधी विचारपूस देखील केली जात नाही. रुग्णांच्या नातेवाईकांनी पेशंटविषयी जास्त चौकशी केली तर करा सिझेरीन असा फंडा वापरला जातो. सिझेरीनचे कारण विचारल्यावर पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
त्यातून ही सिझेरीन सूरक्षित झाले आहे का यावरही प्रश्न चिन्ह . सिझेरीन नंतर महिलांना रुग्णालयात ठेवण्यात येते. या कालावधीत काही महिलांना टाक्यांसंदर्भात त्रास सुरू होतो. उदा. टाक्यांना सूज येणे, टाक्यात पू तयार होणे. यामुळे महिलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. वरील उदाहरणासंदर्भात काही महिलांना १ वर्षे, २ वर्ष तर काही महिलांना तब्बल १० वर्षीनी सुध्दा त्रास झाला आहे. या संदर्भात तज्ञ डॉक्टर यांच्याशी विचारना केली असता सिझेरीन दरम्यान एखादा टाका न विरघळण्याचे कारण देण्यात येते.
तरी यामुळे कित्येक महिलांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत. तरी सिझेरीन दरम्यान योग्य खबरदारी घेतल्यास महिलांना होणारे त्रास कमी होणार आहे. याकडे जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
चौकट : पहिली खेप त्रास तर होणारच : डॉ. सुभाष चव्हाण
काही दिवसांपूर्वी एक गर्भवती महिला जिल्हा रुग्णालय दाखल झाली. खुप त्रास होत असल्यामुळे वार्डमधील कर्मचारी यांना माहिती दिली. परंतु त्यांनी ही दुर्लक्ष केल्यामुळे नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेऊन रुग्णाला होणाऱ्या त्रासाची माहिती दिली. परंतु त्यांनी मी पेशंटची माहिती घेतली आहे. पहिली खेप आहे, त्रास तर होणारच,असे उत्तर देत आपल्या कर्मचाऱ्यांना पाठिशी घालत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढल्याचे चित्र सिव्हिलमध्ये आहे.