बापूराव गावडे यांची माहिती : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आ. दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ
फलटण : खटकेवस्ती, ता. फलटण येथील 100 गरजू गरीब कुटूंबाना प्रधानमंत्री आवास योजनेतून घर बांधून देण्यात येणार असून, यासाठी लागणारी जागाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संबधीत जागेचा सातबाराउतारा लाभार्थांच्या नावावर होणार असून असून हा गृह उपक्रम राज्यातील आदर्श व दिशादर्शक असून या योजनेचा शुभारंभ शनिवार दिनांक १८ रोजी दुपारी ४ वाजता विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व आमदार दीपकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती खटकेवस्तीचे ग्रामपंचायतीचे सरपंच बापूराव दत्तात्रय गावडे यांनी दिली आहे.
महाआवास अभियान टप्पा-२ सन २०२१-२०२२ चा टप्पा असून फलटण पंचायत समिती आणि खटकेवस्ती ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण भुमीपुजन सोहळा व ७/१२ उतारा वाटप केल जाणार असल्याचे सांगत या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार समीर यादव, डी. एस. बोबडे – सावंत, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, डॉ. बाळासाहेब शेंडे, संजय सोडमिसे, सरपंच बापूराव गावडे, उपसरपंच मंदाकिनी सस्ते, ग्रामसेवक संजय देवकर, सविता खटके, योगेश गावडे, धनंजय पवार, उषाताई गावडे, वैशाली गावडे, लक्ष्मण दडस, रंजना खटके, नलिनी खटके, नवनाथ खटके यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास फलटण पुर्व भागातील ग्रामस्थांनी उपस्थित राहवे, असे आवाहन खटकेवस्ती ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.