
महाविकास आघाडी पुरस्कृत पँनेलने सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले असून यात राष्ट्रवादी कॉग्रेस ,राष्ट्रीय कॉग्रेस शिवसेनेचे समर्थक संचालक म्हणून निवडून आलेत.चेअरमनपदाच्या निवडीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉग्रेसला प्रथम संधी देण्याचे ठरल्यानंतर राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक व दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवडून आलेले प्रजोत हणमंतराव भोसले यांची चेअरमनपदी म्हणून तर बापूराव दडस यांची व्हा.चेअरमनपदी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी संचालक जनार्दन भोसले ,विकास निंबाळकर ,लालासो पवार ,अँड.कुंडलिक भोसले ,सौ.रुक्मिणी भोसले सौ.कमल विरकर ,शंकर जाधव ,पांडुरंग साळुंखे ,यशवंत गाढवे ,अशोक अडागळे उपस्थित होते.
नूतन पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख ,राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम.के.भोसले ,शिवाजीराव भोसले शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले ,पंढरीनाथ भोसले , रंगाशेठ भोसले ,अनिल भोसले,हणमंतराव भोसले ,विलास भोसले आनंदराव विरकर , शिवाजीराव बरकडे ,राष्ट्रवादी युवकचे उपजिल्हाध्यक्ष संतोष भोसले ,जोतीराम जाधव ,तात्याबा गाढवे लालासो गाढवे ,सागर महानवर ,मल्हारी जाधव ,तात्याबा भोसले आदी राष्ट्रवादी ,कॉग्रेस ,शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.
संचालकपदाच्या हँट्रीकनंतर चेअरमनपदाला गवसणी…!
माजी प्राचार्य हणमंतराव भोसले सर यांनी राजेंच्या फलटण एज्युकेशन शिक्षण संस्थेत काम केल्यामुळे ना.रामराजे ना.निंबाळकर व संजीवराजे ना.निंबाळकर यांच्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत.राष्ट्रवादीचे कट्टर म्हणून बिजवडी परिसरात ते ओळखले जातात.सुरूवातीला मुलगा प्रजोत व त्यानंतर सूनबाई सौ.वैभवी भोसले सोसायटीत संचालक म्हणून निवडून आले.अन आता तिसऱ्यांदा मुलगा प्रजोत भोसले संचालक म्हणून निवडून आल्याने घरात सलग १५ वर्षे संचालक पद आले आहे.अन आता चेअरमनपदाचीही माळ त्यांच्या गळ्यात पडल्याने संचालकपदाच्या हँट्र्कीनंतर त्यांनी चेअरमनपदाला गवसणी घातली आहे.





















