महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :(ओझर्डे)
गोवेदिगर ता,वाई येथील विघ्नहर्ता गणेश मंडळाचे अध्यक्ष शत्रुघ्न पिसाळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्रीत येऊन गाव व परिसरातील मरीआई ,व काळुबाई मंदिर परिसरात सध्या पडत असलेल्या पावसाचा फायदा घेऊन तब्बल २०० विविध जातींच्या झाडांचे वृक्ष रोपण करुन नवा विक्रम प्रस्थापित केल्याने ग्रामस्थांनी मंडळाच्या या भरीव कार्याचे कौतुक केले आहे
विघ्नहर्ता गणेश मंडळाची गोवेदिगर ता, वाई या सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार आणी अध्यात्मिक दृष्ट्या जागृत असलेल्या या गावात २० वर्षा पुर्वी तरुणांच्या संकल्पनेतून स्थापना करण्यात आली पुर्वी सातारा जिल्ह्यातील कुठल्याच गावात एक गाव एक गणपती हि संकल्पना नव्हती गावोगावी आळी प्रमाणे अनेक तरुण मंडळी एकत्र येऊन गणेश उत्सव साजरा करण्याची आजही परंपरा चालत आली आहे पण याला अपवाद ठरले ते वाई तालुक्यातील गोवेदिगर गाव येथील सर्व जाती धर्माचे प्रतिष्ठित आणी जाणते वयोवृद्ध नागरिकांनी एकत्रीत येऊन येथील तरुणांना एकत्रीत करुन एक गाव एक गणपती हि आवश्यक असणारी संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आणी मंडळातील तरुणांनी देखील हि प्रथा आजही नेटाने चालू ठेवलेली आहे याची दखल भुईंज पोलिस ठाण्याने घेऊन या उपक्रमशील मंडळाला अनेकदा बक्षीस देऊन गौरव केला आहे
अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शत्रुघ्न पिसाळ उपाध्यक्ष अमोल पिसाळ सुशील पिसाळ अमर पिसाळ विकास पिसाळ सुरेश पिसाळ विशाल पिसाळ सौरभ निकम शुभम शिंदे दशरथ पिसाळ बाळकृष्ण पिसाळ दादासाहेब पिसाळ सूरज जाधव अतुल सणस गणेश पिसाळ प्रथमेश जाधव संतोष साळुंखे संतोष जाधव यांनी दिली