महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : महाबळेश्वर-सातारा-धामणेर रहिमतपूर-पुसेसावळी वडगाव (ज.स्वा)-चोराडे ते विटा या रस्त्यावरील धामणेर ता.कोरेगाव येथील कृष्णा नदीवर असणाऱ्या पुलाची पाहणी पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, रहिमतपूरचे माजी उपनगराध्यक्ष दिलीप कदम, कारखान्याचे संपर्क अधिकारी आर जी तांबे, डेप्युटी सिव्हिल इंजिनिअर प्रताप चव्हाण यांनी केली.
सदर पुलाचे विअरिंग कोटची नादुरुस्त झाली असून, दोन सेगमेंट मधील जॉईंट मध्ये अंतर वाढले आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणावर दळणवळण होते. त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांना देण्यात आले आहेत.

या पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून, लवकरात लवकर सुरू करून पूर्ण होईल असे यावेळी कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग पश्चिमचे उपकार्यकारी अभियंता सारंग इनामदार, कन्सल्टंट ठेकेदार सतीश घोगरे, धामणेरचे उपसरपंच प्रवीण क्षीरसागर, पोलीस पाटील जयवंत पाटील उपस्थित होते.






















