महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (फलटण शहर): प्रतापसिंह भोसले
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्य न्यायालय दिल्ली यांनी दि ९ सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासाठी स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजास जबर फटका बसलेला आहे. मराठा समाज आरक्षणा पासून कायम वंचित राहिलेला आहे. मराठा समाज्याच्या मागण्या आहेत की मराठा आरक्षणा बाबत कोणताही निर्णय होई पर्यंत कोणत्याही स्वरुपाची शासकीय नोकर भरती करण्यात येऊ नये.
मराठ्यांना लागू असलेले सध्याचे आरक्षण कायम ठेवण्याचे आदेश सरकारला काढता येतो, तो सरकारने काढावा, व आरक्षणाचा लाभ चालू ठेवावा. मराठा समाजास लागू असलेले सध्याचे शासकीय, निमशासकीय शाळा, कौलेज मधील आरक्षणाचे लाभ कायम ठेवावेत.
अशा विविध मागण्यांसह मागण्या मान्य नाही झाल्या तर मराठा सेवा संघ, सभाजी ब्रिगेड संपूर्ण जिल्ह्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनामधे करण्यात आला आहे. त्या प्रसंगी प्रदिप घाडगे, मयुर जगदाळे, मनोज जगताप, रणजित, दत्ता पवार, वैभव कापसे, आशुतोष मोहीते, अजिंक्य कदम, धनंजय कदम आदी उपस्थीत होते.























