फलटण प्रतिनिधी : कृष्णामाई मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन संचलित निकोप हॉस्पिटल, फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असून सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. जे. टी. पोळ यांनी केले आहे. रविवार, दि. १९ रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत निकोप हॉस्पिटल, रिंग रोड, फलटण येथे आयोजित करण्यात येत असलेल्या या शिबिरामध्ये इ. सी. जी., इको कार्डिओग्राफी, कलर डॉपलर, रक्तातील साखर, हाडाचा ठिसूळपणा, फुफ्फुस क्षमता तपासणी व हृदयरोग तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन आणि औषधे मोफत देण्यात येतील. या शिबिरामध्ये मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, किडनी मुतखडा, दमा, थायरॉईड, पोटाचे विकार, दंत तपासणी, नेत्र तपासणी तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत केली जाईल. एम. आर. आय. व अँजिओग्राफी ५० टक्के सवलतीच्या दरात केली जाईल. मोतिबिंदू शस्त्रक्रिया एस. डी. एच. व लायन्स आय हॉस्पिटलतर्फे मोफत केल्या जातील. कृष्णामाई मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन फलटण, श्री विश्व शिवानंद आयुर्वेदिक हॉस्पिटल, लायन्स आय हॉस्पिटल, फलटण, उपजिल्हा रुग्णालय, फलटण, तालुका वैद्यकीय अधिकारी, फलटण, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्स, मुंबई यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे डॉ. जे. टी. पोळ यांनी सांगितले.