महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (सोमेश्वरनगर ) :विनोद गोलांडे
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोनाची संख्या दोन हजारांच्या वर रुग्ण असल्याचे लक्ष्यात घेता सोमेश्वर कारखाना आणि जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश्वरनगर येथे कोविड केयर सेंटर उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुरूम ता .बारामती येथे पदाधिकारी, प्रशासन परिसरातील गावं सरपंच आणि आरोग्य सेवक यांच्यात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी , प्रांतअधिकारी दादासो कांबळे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे गटविकास अधिकारी राहुल काळभोर सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे सोपान सोमनाथ लांडे राजवर्धन शिंदे सभापती नीता बारवकर उपसभापती प्रदीप धापटे सदस्य नेता फरांदे विक्रम भोसले सोमेश्वर चे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव सतीश सकुंडे कौस्तुभ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते पश्चिम भागात रुग्ण वाढत असल्याने बेड मिळत नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याने काकडे यांनी सांगितले प्रत्येक ग्रामपंचायत आरोग्य रुग्णालय यांनी एक खिडकी योजना देऊन नागरिकांना माहिती द्यावी या सेंटर साठी आरोग्य सर्व स्टाफ देण्याचे आश्वासन काकडे यांनी दिली पंचायत समिती ती गटात 50 वर्ष वयोगटातील नागरिकांनी प्रत्येकी तीन लाख रुपयाची साहित्य आणि गोळ्या देत आहोत स्थानिक डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना कोविड सेंटर साठी मदत करण्याची गरज व्यक्त केली याठिकाणी कोरोनाच्या चाचण्या करण्यात येतील ट्रिपल सी कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे असल्याचे काकडे यांनी सांगितले