: कराड मलकापूर नगरपालिकेच्या आगाशिवनगर विभागात मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट वाढला असून आगाशिवनगर मधील अयोध्यानगरी कॉलनीतील रहिवासी ओंकार पवार वय वर्षे 12 याला मोकाट कुत्र्यान हाताला चावा घेतला असल्याने या विभागात रहिवाशांच्या मनात भीतीच वातावरण झाले आहे. मोकाट कुत्र्या पासून रस्त्यावर चालताना जीव मुठीत धरून चालावं लागत आहे. वयोवृद्ध नागरिकांच्या अंगावर मोकाट कुत्री धावून जात आहेत या परिसरात महिलांना आपल्या मुलांना संभाळून घेऊन जावं लागतं आहे, त्यामुळे अनेकांना घराच्या बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. याबाबत नगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यावर कोणतीही ठोस उपाय योजना केली जात नाही.
नगरपालिकेच्या CEO व आरोग्य विभागाने वेळीच दखल नाही घेतली तर या विभागातील नागरिक रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत.