महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते ना.देवेंद्रजी फडणवीस हे सोमवारी (दि.१९) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणेसाठी पुणे जिल्हाच्या दौऱ्यावरती येत आहेत, अशी भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
विरोधी पक्ष नेते ना.देवेंद्रजी फडणवीस यांचे सोमवारी सकाळी १० वा. बारामती विमानतळावरती आगमन होईल. त्यानंतर दौंड तालुक्यातील मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली या भागाची नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर दुपारी ११.४५ वा. इंदापूर तालुक्यातील सणसर, निमगाव-केतकी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. तेथून विरोधी पक्ष नेते ना.देवेंद्रजी फडणवीस हे माढा (जि. सोलापूर) तालुक्यातील टाकळी, गारअकोले या भागाची पाहणी करणेसाठी जाणार आहेत,अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. विरोधी पक्ष नेते ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.




































