महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
संस्थेची स्थापना 20/9/2014 रोजी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. हनुमंत मोरे मामा धाडसी व्यक्तिमत्व यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्व पदाधिकारी मनापासुन हे सामाजिक कार्य करतात. संस्था स्थापन केल्या पासुन संस्थेच्या माध्यमातुन बेघर, निराधार,भिक्षुक,अपंग , विधवा महिला, शाळा बाह्य विद्याथ्यांसाठी ही संस्था कार्य करीत आहे. या निराधार लोकांना कपडे वाटप करणे, त्यांचे केस कापणे, अंघोळ घालणे, मोफत औषध उपचार करणे निराधार लोकांना दत्तक घेणे, शाळा बाह्य विद्यार्थांना व त्यांच्या पालकांना ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगुन त्यांना जवळच्या शाळेत पाठवणे, त्यांना गणवेश व शालेय साहित्य देणे तसेच गोरगरीब विद्यार्थांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणुन संस्थेचे अध्यक्ष मोरे मामा यांनी शाळेसाठी स्व:ताची ईमारत देऊन विद्यार्थांचा सर्व खर्च मोरे मामा स्वत: करतात.

खरंच त्यानी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. संस्थेने आज पर्यंत ८८ निराधार लोकांना दत्तक घेतले आहे. या लोकांना कुठलाही व कूणाचा ही आधार नाही, या लोकांसाठी संस्थेने निवारा, घर सुरू करण्याचा मानस आहे. हे लोक एका छता खाली राहीले तर त्यांच्या आरोग्याचा व जेवणाचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी संस्थेने प्रयत्न सुरु केले आहेत. या पवित्र कार्या साठी अनेक सामाजिक व दानशुर लोक पुढे येऊन मदत करीत आहेत. आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतुन या पवित्र कार्यसाठी आपणही मदत करावी, असे अध्यक्ष हनुमंत मोरे यांनी जाहिर आव्हान केले आहे. संस्थेच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.






















