महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :पिंपोडे बुद्रुक
आजच्या घडीला सोशलसाईटवर भारतात मनोरंजन , सामाजिक , राजकीय , धार्मिक आणि तरुणाईचे असंख्य ग्रुप , पेज तयार झालेले आहेत . या ग्रुपचा वापर जास्तीत जास्त मनोरंजन , माहितीची देवाण घेवाण अथवा एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी केला जातो .
महाराष्ट्रासारख्या राज्यात मराठा समाजाने यापलिकडे जाऊन फेसबुकवर पेजद्वारे दहा लाख युजर्सला एका ठिकाणी आणून विधायक कामाला सुरवात केली. हा अराजकीय फेसबुक ग्रुप म्हणजे वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन ( डब्लू,एम,ओ ) आजघडीला या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो विद्याथ्यांना शिष्यवृत्ती , हजारो युवकांना नोकरी आणि असंख्य तरुणांना व्यवसाय उभारणी , प्रसिद्धी देण्यासाठी या ग्रुपने पुढाकार घेतला . अगदी शून्यातून सुरु झालेल्या या ग्रुपचे फेसबुकवर 10 लाख , तर व्हाटसअँपपद्वारे 50 हजाराहून अधिक समाजबांधव जोडले गेले आहेत . छोट्याछोट्या कामांतून हा ग्रुप आता व्यापक होत चालला आहे
या संघटनेच्या माध्यमातून एका सिस्टीमने काम होत . ज्यावेळी एकदा रुग्ण सापडतो किंवा ज्याला बेड मिळत नाही , ऑक्सिजन व्हेंटिलेतर ऍम्ब्युलन्स मिळत नाही,कोणाची गाडी बंद पडली आणि अश्या अनेक अडचणी असतात अश्या वेळी या अडचणीची पोस्ट फेसबुक , वॉट्स अप ग्रुपवर पाठवली जाते की या व्यक्तीला मदत हवी आहे आणि दुसऱ्या मिनीटापासून मदतीसाठी फोन यायला सुरुवात होतात. या परिवारात सोशल मीडियाच्या माध्यमातुन काम करणारी टीम
आज सातारा,सांगली,कोल्हापूर, पुणे, अहमदनगर , बीड, नांदेड, रत्नागिरी, मुंबई,सहीत सर्व महाराष्ट्रात हि टीम अहोरात्र काम करत असून अनेक गरजू रुग्णांना मदत पोहचली आहे आज प्रशासन यंत्रणा तोडकी पडत असताना रात्री अपरात्री गरजू कोरोना रुग्णांना मदत करण्याच काम हि टीम राज्यभर करत आहे. खरच अशा माणुसकीची गरज या कोरोना काळात प्रकर्षानं जाणवते सोशल मीडियाचा किती चांगला वापर होतो हे ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’ (डब्लू.एम.ओ) या संघटनेच काम आणि वेग पाहिल्यावर लक्षात येते अनेक ज्ञात अज्ञात समाज सेवक यांची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे.
यामध्ये प्रामुख्याने प्रवीण पिसाळ सर हे ‘डब्ल्यू,एम,ओ’ टीम लीडर आणि सातारा जिल्हा ऍडमिन टीम काम करत आहेत व त्यांच्या बरोबर त्यांचे असंख्य साथीदार खरच या कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांना वैदयकिय मदत उपलब्ध करून देऊन खऱ्या अर्थाने ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’
(डब्लू.ए म.ओ) हि संघटना देशसेवाच करत आहे.येत्या काही दिवसात कोरोना रोगावर लस निर्माण होईल हा रोगही जाईल पण खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत काम करणारे कोरोना योध्ये लक्षात राहतील व त्याच बरोबर अनेकाचं प्राण वाचवणारी वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन (डब्लू.ए म.ओ) संघटना व त्यात काम करणारे सर्व योध्ये नक्कीच लक्षात राहतील व त्यांच हे काम नेहमी समाजाला दिशा देणारं असेल .