पुणे : संपूर्ण जग हे कोरोना सारख्या विषाणूशी लढत आहे आणि अशा स्थितीमध्ये लढत असताना वेगवेगळ्या व्हायरसची लक्षणे ही दिसून येत आहेत.महाराष्ट्र मध्ये दुसरी लाट ओसरली असतानाच तिसऱ्या लाटेचे संकेत दिसू लागले आहे. अशातच महाराष्ट्र मध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर या गावांमध्ये झिका या व्हायरसचा एक रुग्ण आढळून आलेला असून हा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण असल्याचे सांगितले गेले.बेलसर हे पुरंदर तालुक्यातील सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव असून त्या ठिकाणी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून ताप आढळून येत होते, त्यातील पाच रुग्णांचे नमुने दिनांक १६ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे येथे तपासणीसाठी पाठवले असता त्यापैकी तीन जणांना चिकनगुनिया आजाराचे निदान झाले.दिनांक २७ ते २९ जुलै २०२१ या कालावधीत राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या डेंगू चिकनगुनिया विभागाचे प्रमुख डॉक्टर योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ बेलसर आणि परिंचे या भागात भेट देऊन सुमारे ३१ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित केले. मते २५ जणांना चिकनगुनिया तर तीन जणांना डेंगू आजार असल्याचे प्रयोगशाळा अहवालातून स्पष्ट झाले असून बेलसर गावातील एका पन्नास वंशाच्या महिलेस झिका विषाणू आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष दिनांक ३० जुलै २०२१ रोजी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्र मध्ये आढळलेला पहिला झिका रुग्ण आहे. सदर रुग्ण चिकनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे.झिका रुग्ण आढळल्याचे पार्श्वभूमीवर बेलसर गाव आणि परिसरात राज्य शीघ्र प्रतिसाद पथकाच्यामार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे.पुणे :