कट्टर शिवसैनिकाला खा.श्रीकांत शिंदेंची आपुलकीची भेटशिवविचारांचा संग्रह पाहून उपस्थित चकित कट्टर शिवसैनिकाला खा.श्रीकांत शिंदेंची आपुलकीची भेट
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड येथील कट्टर शिवसैनिक महेश पाटील यांच्या निवासस्थानी खा.श्रीकांत शिंदे यांनी सुमारे ४० मिनिटे आपुलकीची सदिच्छा भेट दिली.यावेळी पाटील यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता साध्या पत्र्याच्या घरात दै सामना अंकाची केलेली जपणूक तसेच संग्रहातील विविध पुस्तके, वस्तू आणि गेल्या पस्तीस वर्षातील शिवसैनिक महेश पाटील यांचे कार्य ऐकतांना तल्लीन झालेले खा.शिंदे सुद्धा अवाक झाले होते.
सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र ना.एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खा.श्रीकांत शिंदे यांच्याबाबत कायमच जिव्हाळा आणि आपुलकीची भावना जिल्हावासीय व्यक्त करीत असतात. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एका सामान्य शिवसैनिकाच्या घरी भेट देऊन कट्टर शिवसैनिकाप्रती असणारा आदर यावेळी दिसून आला यामुळे खा.शिंदे यांच्या साधेपणाचीचर्चा उंब्रज परिसरात घडत आहे.अतिशय विनयशील बोलणे आणि कार्यकर्ता जपण्याची वृत्ती या भेटीमुळे अधोरेखित झाली आहे.
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील विविध तालुके आणि विभागांमध्ये पदाधिकारी आणि शिवसैनिक संवाद मेळावे सुरु असून शनिवारी दौऱ्यादरम्यान शिवसेना उपनेते व सातारा-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नितिन बानुगडे-पाटील यांच्यासमवेत उंब्रज ता.कराड येथील एक कडवट शिवसैनिक महेश पाटील यांची त्यांच्या घरी भेट घेतली.
शिवसैनिक महेश पाटील यांनी दै.सामना या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या वृत्तपत्राची सुरुवात झाली तेव्हापासून प्रकाशित झालेला पहिला अंक २३ जानेवारी १९८९ ते आजपर्यंतचे सर्व अंकांचा संग्रह केला असून याबरोबरच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केलेले मार्मिक या साप्तहिकाच्या अंकांचा देखील त्यांनी संग्रह केला आहे. आज या भेटीमध्ये पाटील यांनी या जतन केलेल्या दै.सामना आणि मार्मिक चा संग्रह पाहिला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेला दै. सामना वृत्तपत्राचा संग्रह पाहून खरचं थक्क झालो. शिवणकाम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे महेश पाटील हे भाड्याच्या घरात राहत असून त्यांनी त्यांच्या घरात संग्रहारुपी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जतन करुन ठेवले आहेत आणि त्यांचे हे कार्य युवासैनिकांना प्रेरणा देणारे आहेत, अशी भावना या भेटीदरम्यान व्यक्त करत शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कुठलाही स्वार्थ न ठेवता काम करणारे मेहनती, पक्षनिष्ठ कट्टर शिवसैनिक श्री. महेश पाटील यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा खा.श्रीकांत शिंदे