सुनील निंबाळकर / पुणे प्रतिनिधी
पुणे दि. 22 : प्रधानमंत्री किसान सम्मान योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यास लाभार्थी भौतिक तपासणी बाबी अंतर्गत देश पातळीवरील सर्वोत्कृष्ट कामाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. याचबरोबर उत्कृष्ट काम करणा-या जिल्ह्यांमध्ये राज्यातील पुणे व अहमदनगर जिल्ह्यास अनुक्रमे लाभार्थी तक्रार निवारण व भौतिक तपासणी बाबी अंतर्गत प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. पुणे जिल्हयाचा गौरव होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केंद्रीय कृषी मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ रोजी अे. पी. शिंदे सभागृह, एनअेएससी कॉम्प्लेक्स , पुसा नवी दिल्ली येथे दुपारी १२ ते १ च्या दरम्यान संपन्न होणार आहे.