महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बारामती / सुनील निंबाळकर :
पिसुर्टी (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सारिका संजय चोरमले तर उपसरपंच पदी सुखदेव दादा बरकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कुंजीर यांनी दिली.
नुकतीच झालेली ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये येथील एक जागा बिनविरोध झाल्याने सहा जागांसाठी चुरस निर्माण झाली होती.
शिवशक्ती पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र बरकडे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने चार जागा हस्तगत करत माणिकराव चोरमले, अशोक बरकडे,पोपट बरकडे व जगन्नाथ बरकडे यांच्या भैरवनाथ महाविकास आघाडी पॅनलचा धुराळा उडविला असल्याची चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार बुधवारी (ता.१०) येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच व उपसरपंच निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये सरपंच पदासाठी सारिका संजय चोरमले व उपसरपंच पदासाठी सुखदेव दादा बरकडे यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंचपदी सारिका चोरमले तर उपसरपंचपदी सुखदेव बरकडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कुंजीर यांनी जाहीर केले. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शितल चोरमले, कलुबाई बरकडे, सारिका बरकडे, दत्तात्रय बरकडे, ज्योती बरकडे आदी उपस्थित होते.
निवडणूक प्रसंगी तलाठी नंदकुमार खरात,ग्रामसेविका सीमा गावडे व पोलीस पाटील सुजाता बरकडे यांनी सहकार्य केले. निवडीनंतर माजी सरपंच सविता बरकडे, राजेंद्र बरकडे व पुरंदर तालुका भाजपच्या उपाध्यक्ष दादा बरकडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचासह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पांडुरंग बरकडे, संजय चोरमले,माणिक चोरमले, आप्पा काळे,भरत बरकडे,साहेबराव बरकडे,दिलीप बरकडे व बापूराव बरकडे आदी उपस्थित होते.