महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
ऑक्टोबर महिन्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील घरांचे प्रचंड नुकसान होत झाले आहे,मौजे रेडणी(ता. इंदापूर)येथील दगड , मातीच्या बांधकाम व माळवादाची घरे पडली आहेत , त्यामुळे लोकांच्या निवऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे , या महिन्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे घरातील पीठ , रेशनचा गहू , तांदूळ याची मोठ्या प्रमाणात नासाडी व आर्थिक नुकसान झाले आहे .या लोकांच्या निवाऱ्याचा व उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे , तहसील कार्यालय स्तरावरील व पंचायत समिती स्तरावरील प्रशासकीय विभागाने याची दखल घ्यावी,व शासन स्तरावर मदत मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे .
सध्या रेडणी गावात इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या माध्यमातून रेडणी ग्रामपंचायत च्या ग्रामसेविका अंबिका पावसे , ग्रामपंचायतीचे लेखनिक हरिदास काळे , गावकामगार तलाठी बाळासाहेब तांबीले , घनश्याम जवंजाळ , तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक गुरव हे स्थळ पाहणी करीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत आहेत.