प्रतिनिधी फलटण
राज्यातील चारही कृषी विद्यालयाचा ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड कार्यक्रम कोरोना प्रादुर्भावामुळे स्वतःच्या गावात विद्यार्थी राबवत आहेत व गावकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
फलटण मधील कृषी महाविद्यालयात विद्यार्थी अभिषेक फडतरे याने त्याच्या फडतरवाडी गावात सेंद्रिय शेतीवर गटचर्चा या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम करून संपन्न केला या वाढत्या रासायनिक खतांच्या कीटकनाशक, तणनाशक त्याच्या प्रादुर्भावामुळे वाढत्या प्रदूषणाचे दुष्परिणाम किती भयानक आहेत हे शेतकऱ्यांना समजले याशिवाय त्याचा खर्च हे जास्त यावर उपाय म्हणून आपण सेंद्रिय शेती कशी करू शकतो याचे अनमोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना झाले यामध्ये गांडूळ खत, शेणखत, कोंबडीखत, दशपर्णी अर्क ,जीवामृत या संकल्पनां वरती चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांचे शंकांचे निरसन गणेश रणवरे कृषी सेवक तांबवे विभाग यांनी केले
या चर्चेला ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला यावेळी फडतरवाडी गावचे उपसरपंच अनुराज नलवडे ,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी निंबाळकर, प्राध्यापिका एन. एस .धालपे प्राध्यापक एस. वाय.लाळगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले