महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी :
कराड तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीन, भूईमूग,पीकांचा हंगामाचा कालावधी संपत आला असल्यांने शेतकऱ्यांनी काढणी सुरु केली आहे.पण अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे हा हंगाम अडचणीत आला आहे.दररोज वेळीअवेळी पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.दरम्यान हा पाउस भात पिकासाठी पोषक ठरत आहे.
तालुक्यातील जिरायती,बागायती दोन्ही क्षेत्रांत शेतकरी सोयाबीन, भूईमूग पीकाची लागवड करुन खरीप हंगामात उत्पादन घेतात.जून महिन्यातील पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात पेरणी,टोकणी झालेल्या पीकांचा काढणीचा कालावधी संपला आहे.पण काही शेतकऱ्यांनी काढणी केली असली तर अनेक शेतकऱ्यांचे पीक शेतात उभे आहे.दररोज पडत असलेल्या पावसामुळे काढणी करता येत नाही.तर पीकाचा कालावधी संपल्यांने काढणी अभावी पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही शेतकऱ्यांनी काढणीस आलेल्या भुईमूगाचे पीक शेतातच उपटून ठेवले आहे.तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढनी मळणी करुन वाळवण देण्यासाठी उन्हाच्या प्रतिक्षेत आहेत.
जिरायती विभागातील पंन्नास टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनची बुचाडे लावून ठेवली आहेत.तर अनेकांची काढणी पाऊसामुळे खोळंबली आहे. सध्या पडत असेला पाऊस भात पीकास पोशक असला तर काढणीस आलेल्या पीकास हाणीकारक ठरत असल्याची परिस्थिती कराड तालुक्यात पाहावयास मिळत आहे.




















