शिक्षण आणि आरोग्य विभागाचे नियोजन
विनय गौडा जी सी यांची माहिती
*सातारा ,दिनांक 2 :जिल्ह्यामध्ये कोरोना नियंत्रणाचे सर्व स्तरावर प्रयत्न चालू आहेत. लसीकरण हा या प्रयत्नांमधील महत्त्वाचा टप्पा आहे. त्याअंतर्गत 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोविड चे लसीकरण पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या असून हे लसीकरण 11 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करावयाचे आहे ,अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिली . जिल्ह्यातील नववी ते बारावी या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या शाळांची संख्या 814 असून नववी ते बारावी दरम्यानच्या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख 59 हजार 793 इतकी आहे .त्यापैकी 1,00,125 विद्यार्थ्यांचे म्हणजे 63 टक्के विद्यार्थ्यांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 59 हजार 668 विद्यार्थी उर्वरित आहेत. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून ही मोहीम आखण्यात आली आहे .15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना 11 फेब्रुवारी पर्यंत 100% टक्के लसीकरण करावयाचे आहे. ही मोहीम सध्या चालू आहे .परंतु या मोहिमेला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने पावले उचलून या महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या वयोगटांमध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होतो. या सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण शंभर टक्के पूर्ण होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात संबंधित शाळा असेल त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधून समन्वयाने लसीकरण पूर्ण करावयाचे आहे. त्यासाठी आरोग्य केंद्रांची यादी शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. संबंधित विद्यालयात लसीकरण कॅम्पचे आयोजन संबंधित तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून संबंधित विद्यालय करणार आहे. लसीकरण कॅम्पसाठी वर्गखोली बैठक व्यवस्था यासारख्या सर्व भौतिक सुविधा विद्यालयांनी उपलब्ध करून द्यावयाच्या आहेत. महत्त्वाचे असे की शंभर टक्के पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावयाचे आहे. त्यांचे प्रबोधन करावयाचे आहे .11 तारखेपर्यंत 100 टक्के लसीकरण पूर्ण करून गटशिक्षण अधिकारी यांचे मार्फत अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व गटशिक्षण अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. लसीकरण पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याला गती यावी म्हणून हे विशेष नियोजन करण्यात आले आहे. हे लसीकरण पूर्ण होण्यासाठी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्राचार्य यांनी वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करावा ,असे देखील आदेशात म्हटले आहे. दरम्यान हे लसीकरण पूर्ण करण्यासाठी पूर्ण नियोजन झाले आहे अशी माहिती शिक्षण आणि आरोग्य विभागातून देण्यात आली