म्हसवड प्रतिनिधी :- सध्या माण तालुक्यातील बळीराजा निसर्गनिर्मित व मानवनिर्मित संकटात सापडला असून पुर परिस्थीती, अवकाळी, पावसाने वाहुन गेलेली शेती या आसमानी संकटा असताना मानव-निर्मित अनियमित विजेची समस्याने शेतकरी राजा हतबल झाला असुन म्हसवड शहर ते पालिकेचे शहर व तालुक्यातील सर्वात मोठे शहर म्हणून म्हसवडला शेनवडी, मायणी व दहिवडी या तिन सब स्टेशन वरुन म्हसवड शहरातील विजेचा घोटाळा झाला तर म्हसवडचा विजा पुरवठा सुरु रहावा यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून म्हसवडकर नागरीकांनी सातारा व वडुजच्या विज वितरणच्या अभियंत्यांना निवेदन देवून लाखों रुपये खर्च करुन लाईन टाकललेल्या नुसत्या शोपिस बनल्या असुन मायणीवरुन विजेचा घोटाळा झाला तर शहराची लाईट दिवस दिवस येत नाही रात्रीची ही १२,१ वाजेपर्यात लाईट गेलेली असते. म्हसवड विज वितरण कार्यालयात रितसर कामा पेक्षा दोन नंबरच्या कामांना महत्त्व देवून आधिच पावसाने संकटात सापडलेल्या बळीराजाला म्हसवड विज वितरण कंपनी आणखी संकंटात लोटत आहे. वरिष्ठांणी वेळेत लक्ष घालावे अन्यथा म्हसवडकरांना रस्त्यावर उतरावे लागेल.
विज वितरण कंपनीच्या कार्यालयातील ढिसाळ कारभारामुळे महावितरण कंपनी महा समस्यांची कंपनी बनली असून वीज कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार कामामुळे वारंवार वीज खंडित होत असल्याने पाणी असून भागातील पिकांचे पाणी न देता आल्याने उभी पिके पाण्यावाचून सुकू लागली आहेत.
येथील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून वारंवार विद्युतपुरवठा खंडीत होणे, कर्मचारी वेळेवर काम करीत नाहीत फिडरच्या इनकमींग लाईन ब्रेकर होऊन वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो याकडे वरीष्ठ पातळीवरुन दुर्लक्ष होत आहे. विजेचा लोड नसेल तर एवढ्या वेळा ट्रीपिंग होऊन वीज खंडीत का होते? शासनाने शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत चालावा वीज खंडित होऊ नये यासाठी येथील सबस्टेशनला तीन तीन वाहिन्या म्हसवड शहरासाठी लाईट कायमस्वरूपी देण्यासाठी जोडल्या आहेत. पण प्रत्यक्षात दोनच सुरु असून लोड शिल्लक नाही, तर शेनवडी वाहिनी अद्याप कार्यन्वित झाली नाही फक्त मायणी वाहिनीवरुनच पुरवठा सुरु असून या वाहिनीवर अनेक वेळा दोष निर्माण होतात व जादा दाबामुळे अनेक वेळा वीज खंडीत होते तर पावसाळ्यात पावसाचे टिपके पडायला लागले कि वीज गायब होते. शेतकऱ्यांची पिके वाळून जातात पिक हातचे जाते याला जबाबदार कोण? शेती वाहिनी कामासाठी बंद केली तर त्याची वेळ वाढवून दिली जात नाही. शहरातही वीज बारा बारा तास पावसाळ्यात गायब होते. तिन्ही वाहिन्या असून या कामांच्या ढिसाळपणा व दुर्लक्षामुळे शहरातील व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागते.
याला कोण जबाबदार कोण?
तत्कालीन राज्याचे ऊर्जामंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातुन २००९/ १० साली ३३कोटी खर्चाचे १३२/ ३३ चे म्हसवड येथे विद्युत उपकेंद्र मंजूर केले यासाठी जमीन अधिग्रहन केली गेली पण येथे उपकेंद्राची गरज नसल्याचे नंतर आलेल्या वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिशाभूल करीत त्यावेळेस म्हसवड भागात मागणी कमी आहे असे अधिकाऱ्यांनी दाखवून त्या ठिकाणी सोलर सौर ऊर्जा प्रकल्प माथी मारत काऱ्यान्वित केला गेल्याने आजपर्यत दहा वर्ष उलटूनही गरज असतानाही विद्युत उपकेंद्र होऊ शकले नाही. ते झाले तर वारंवार वीज खंडीत होणे कमी दाबाने वीज मिळणेच्या समस्येतुन वीज ग्राहकांची सुटका झाली असती.
महावितरणचे विभागीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करुन हि विज समस्येत सुधारणा होण्याऐवजी वाढच झाल्याचे दिसुन येत आहे. पावसाळा संपत आला तरी तालुक्यात दमदार पावसाने अद्याप हजेरी लावल्याने उपलब्ध पाण्यावर पिके तग धरुन आहेत. शेतकरी वर्गाला अजून आशा आहे दमदार पाऊस होईल ओढे नाले वाहतील पाणी संकटातून मुक्त होऊ या चिंतेत बळीराजा आहे. सध्या कांदा, ऊस, बाजरी व इतर पिके शेतात आहेत शेतकऱ्यांना दोन दोन महिने प्रतिक्षा करुनही युरीया खते मिळत नाहीत. शेजारील सोलापूर, सांगली जिल्ह्यातुन खते आणावी लागत आहेत. तिथे तात्काळ उपलब्ध होत आहेत आपल्या इथे का मिळत नाहीत? तसेच औषधे, बि-बियाणे चढत्या भावात विक्री केली जात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी तालुक्यातील संबंधीत कृषी खात्याच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
शेतकरी बाळासाहेब माने – यांनी केलेल्या युरीया मागणीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना ५० टक्केच पुरवठा होत असल्याची परिस्थिती आहे. पण सब डिस्टीब्युटरने युरियाची मागणी केल्याप्रमाणातच युरियाचा पुरवठा होत आहे.
प्रकाश पवार – तालुका कृषी अधिकारी येथील शेतकरी तिहेरी संकटात अडकला असून वीज समस्या पाऊस नाही, युरीया खताची टंचाई या तिहेरी संकटात शेतकरी अडकला असून संबंधीत विभागाने दुष्काळी जनतेला या समस्यातुन सुटका करावी अशी मागणी केली जात आहे.