महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बिलकीस शेख
पुणे हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या पाणी प्रश्न संदर्भात जनतेच्या समस्या घेऊन पाणी पुरवठा विभागातील मुजोर अधिकाऱ्यां विरोधात जनआंदोलन उभे केले असता प्रशासनाने दबावतंत्र वापरत आ.योगेश आण्णा टिळेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ खंडाळा तहसीलदार यांना निवेदन देऊन अटकेचा जाहीर निषेध करण्यात आला व दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी करून भविष्यात प्रशासनाने अशा प्रकारची दडपशाही केल्यास भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी हिताचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने संमत केलेल्या ऐतिहासिक कृषी विधयेकास विरोध करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याचा निषेध करून तहसीलदार यांना निवेदन देऊन कृषी विधेयकाला दिलेली स्थगिती तात्काळ हटविण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली.
यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अनुप सुर्यवंशी, भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश युवक सहसंपर्कप्रमुख निखिल झगडे,भाजपा सातारा जिल्हा चिटणीस देविदास चव्हाण,भाजपा खंडाळा तालुका माजी अध्यक्ष राहुल हाडके,शेतकरी संघटना किसान मंच सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव, भाजपा खंडाळा तालुका सरचिटणीस कृष्णा बरकडे, महिला मोर्चा खंडाळा तालुका अध्यक्ष वनिता शिर्के,खंडाळा तालुका सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष धर्मेंद्र वरपे,खंडाळा तालुका माजी उपाध्यक्ष माऊली पाचे, खंडाळा नगरसेवक दत्ताभाऊ गाढवे,खंडाळा नगरसेवक साजिद मुल्ला,युवा मोर्चा खंडाळा तालुका सरचिटणीस अलंकार सुतार,इम्रान काझी,हितेश जाधव,श्रीकांत घाटे,अशोक वीर,आनंद गुळुंबकर, गणेश गजफोडे,संतोष देशमुख,राहुल निकम,सचिन मोटे, रवी ढमाळ व कार्यकर्ते उपस्थित होते.