जगभरामध्ये कोरोना महामारीने हाहाकार माजवला असल्यामुळे सर्व आर्थिक गोष्टी डबघाईला आल्या सर्व उद्योगधंदे बंद झाले. पण काही काळानंतर जिल्हा स्तरावर प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतीबंधत्मक उपाय म्हणून घातलेल्या जाचक अटी शिथिल करण्यात आल्या, त्यामध्ये हॉटेल व्यावसायिकांसाठी जेवणाची सुविधा त्यांना हॉटेलमध्ये न देता पार्सल द्यावे किंवा उद्योगधंदे सकाळी नऊ ते पाच या वेळेतच असावीत ह्या सूचना प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या परंतु सातारा जिल्हा मधील काही व्यवसायिक प्रशासनाचा हा नियम डावलून राजरोसपणे येणाऱ्या गिर्हाईकाला आपल्या हॉटेलमध्येच जेवायला देणे, किंवा पाच नंतर दुकाने उघडे ठेवून गर्दी करणे, त्यामुळे हे व्यवसायिक हा कोरोना संसर्ग पसरवण्यासाठी हातभारच लावत आहेत का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.