महाराष्ट्र न्यूज मसूर प्रतिनिधी :
कराड तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीनची व भुईमूग पीकांंची काढणी करुन हस्त नक्षत्राच्या दरम्यान खरीपातील शाळू पीकाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग शिवारात सुरू झाली आहे.
सध्या पाऊसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतातील ओलवर पेरणी करु लागले आहेत.खरीप हंगामातील सोयाबीन, भूईमूग,पीकाची काढणी करुन अनेक शेतकऱ्यांनी कराड तालुक्यात पुर्वेकडील विभागात पेरणी सुरू केली आहे.जिरायती विभागातील शेतकरी पेरणीसाठी गडबड करतात. हस्त नक्षत्राच्या दरम्यान केलेल्या पेरणीला पीकाला चांगला उतारा पडतो.तर अनेक शेतकऱ्यांच्या विहरीची पाणी मार्च महिन्यात पातळी कमी होते.त्यामुळे शाळू पीकाला पाणी देण्यासाठी आडचणी येतात त्यासाठीच शाळू पीक पेरणी करण्यास गडबड करतात.
जिरायती विभागातील शेतकरी वर्षात दोन पीके घेतात.खरीपात सोयाबीन तर ते काढून रब्बी हंगामातील शाळू पीक घेतले जाते त्यातील एक पीक उत्पादन खर्चात गेले तर दुसरे पीक फायद्याचे ठरते.गत वर्षी शाळवाला चांगला भाव मिळाला होता क्विटणचा दर चार हजार सातशे रूपये दरम्यान होता.तर शेकडा शाळवाच्या पेंडीचा दर एक हजार तीनशे रूपयेच्या दरम्यान होता.
सध्या सोयाबीन पीकाची काढणी करूण शेतातील खुरपणी करून पेरणी केली जात आहे.ही पेरणी करताना बरेच शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करत आहेत.तर अपवादानेच बैलाची पेरणी दिसत आहे.