सातारा गुन्हे शाखेची कामगिरी: चार लाखांचा मुद्देमाल जप्त……
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी: गेल्या महिनाभरात सातारा गुन्हे शाखेने कराड तालुक्यात धडक कारवाई केली आहे, दोन ठिकाणी बेकायदा बाळगलेले पिस्टल आरोपी सह ताब्यात घेतले असून आज कराड नजीकच्या गोळेश्वर गावात आयपीएलवर लावण्यात येत असलेल्या सट्ट्यावर छापा टाकत लाखो रुपयांचा ऐवज चौघांसह ताब्यात घेतला आहे.
सातारा गुन्हे शाखेच पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना बातमी मिळाली होती की , कराड तालुक्यातील गावचे हद्दीतील सज्जाद युनुस कच्छी यांचे मालकीचे माया एलाईटी काँटी रोहाऊस नं .४ मध्ये काही इसम चेन्नई विरुध्द दिल्ली या २०-२० आयपीएल क्रिकेट सामन्यावर लोकांचेकडुन फोनद्दवारे संपर्क साधुन सट्टा नावचा जुगार चालवित आहेत . त्याप्रमाणे त्यांनी सहा.पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन मिळाले बातमीचे ठिकाणी छापा टाकणेबाबत सुचना दिल्या .
सहा.पोलीस साबळे यांनी व त्यांचे पथकाने गोळेश्वर कराड हद्दी हद्दीत मिळालेल्या बातमीनुसार सापळा लावुन छापा टाकला असता तेथे चार इसम हायप्रोफाईल पध्दतीने चेन्नई विरुध्द दिल्ली या २०-२० क्रिकेट आयपीएल सामन्यावर लोकांचेकडुन फोनद्दवारे सट्टा नावचा जुगार चालवित असताना मिळुन आले त्यांचेकडे १ एलसीडी व सेट टॉप बॉक्स , १ लॅपटॉप , ० ९ मोबाईल फोन , टु व्हिलर गाडया , रोख रक्कम व जुगार साहीत्य असा एकुन ४,०२,८०० / – ( चार लाख दोन हजार आठशे ) रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आलेने सदर इसमांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला आहे, ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये वशिम इक्बाल मेमन (वय ३३) , रा . १ ९ ७ , गुरुवार पेठ कराड, समीर जावेद शेख (वय २०) , रा कार्वेनाका कराड, मुनीर दस्तगीर चबनुर (वय २ ९), रा शनिवार पेठ कराड, जैद जलालउद्दीन पालकर (वय २२) , रा मंगळवार पेठ , कराड यांचा समावेश आहे.
सातारा जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल,अपर पोलीस अधीक्षक धिरज पाटील, यांचे सुचनांप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखा पो. नि.सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे,पो.हवा. सुधीर बनकर , अतिष घाडगे , संजय शिर्के , पो.ना. साबीर मुल्ला , शरद बेबले , मंगेश महाडीक , मुनीर मुल्ला , प्रविण फडतरे , प्रमोद सावंत , पो.कॉ. वैभव सावंत, मोहसीन मोमीन , मयुर देशमुख , चालक पो.ना. संजय जाधव , विजय सावंत यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला . सदर कारवाईमध्ये सहभाग घेतलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी अभिनंदन केले आहे .






















