कराड : असंघटित कामगार महिला व पुरूष यांना या कार्डाचा फायदा होणार आहे. या कार्डमुळे शासनाच्या विविध योजनासंह इतर आर्थिक मदत थेट या कार्डवर जमा होणार आहे. सध्या हे कार्ड मोफत काडून मिळत आहे. त्यामुळेच छोटे व्यवसायीक व मोलमजुरी करणार्या महिला व पुरूषांनी यांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन शिवसेना उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी केले.
कराड दक्षिण तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीने चचेगाव येथून ईश्रमकार्ड नोंदणी अभियानाचा शुभारंभ शिवसेना उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांच्या हस्ते झाला. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीला अभिवादन करण्यात आले. यावेळी जाधव बोलत होते. तसेच या आधी राबवले गेलेल्या प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियानात ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य उत्तमआण्णा पाटील, कार्वे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष मारूती जाधव, चचेगावचे सरपंच महेश पवार, उपसरपंच तानाजी थोरात, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश पवार, महाईसेवा केंद्राच्या प्रमुख संचीता पाखले, राजनंदिनी गृपचे सचिन पवार, ग्रामपंचायत सदस्य वनिता बोडरे, युवराज पाटील, मलकापूर उपशहर प्रमुख दीपक मुट्टल, शिवसेना विभाग प्रमुख प्रविण लोहार, धनाजी पाटणकर, शाखाप्रमुख कृष्णत बोडरे, आंनदा दगडे, शंभू पाटील, शंशीकांत दगडे व शिवसैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश पवार यांनी प्रस्तावित व आभार मानले.