महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पाटण
जनतेला न्याय मागण्यासाठी पोलिस ,कोर्ट कचेरी आदी यंत्रणा कार्यरत आहेत मात्र पाटण तालुक्यात कोयना विभागातील नाव गावांत आजही गावपंचायतींतून गावातील न्यायनिवाडा होत असून दोनच दिवसांपूर्वी या गावपंचायतींचा अजब कारभार पहावयास मिळाला . गावपंचायतीने गावातील एका कुटुंबातील मयत व्यक्तीच्या शेवटच्या धार्मिक विधी साठी गावी आलेल्या कुटुंबातील व्यक्तींना बहिष्कृत करण्याचा संतापजनक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला असून या प्रकाराची संपूर्ण विभागात चर्चा सुरू आहे, कोयना विभागातील या गावांत गावपुढा-यांनी गावपंचायतींच्या माध्यमातून स्थानिक सर्वसामान्य कुटुंबांना बहिष्कृत करुन या कुटुंबातील लोकांना वेठीस धरूण त्यांचे जिणे मुश्किल करून टाकले आहे, यावर अनेकदा तक्रारी झाल्या, गुन्हे दाखल झाले मात्र येरे माझ्या मागल्या प्रमाणे कायद्याला न जुमानता या गावपंचायतींचा अन्यायकारक कारभार सुरुच असुन गावातील व्यक्तीचे जिणे मुश्किल झाले आहे. यामुळे सबंधित गावपंचायतीं बरखास्त करून पंचगीरी करणा-या गाव पुढा-यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी येथील अन्यायग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे , याबाबत गतवषीॅ कोयना भागातील नाव गोवारे, नाणेल या गावांमध्ये काही कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकुन त्यांची पिळवणूक केल्या प्रकरणी सबंधित गावपंचायतीतील काही गावपुढा-यांवर कोयना पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते, मात्र यातुन या गावपुढा-यांनी धडा न घेता गावपंचायतींच्या आडून आपला मनमानी कारभार गावात सुरूच ठेवला असून या व्यवस्थेने पोलिसांनाच पुन्हा आव्हान दिलेचे सध्याच्या प्रकारावरून तरी दिसत आहे. या जातपंचायतींकडून सर्वसामान्य माणसाला कोडींत पकडुन अन्याय कारक निर्णय घेतले जातात हे पुर्णत: चुकीचे आणि समाजीक व कायदेशीर न्यायवयस्थेला धरुन नाहीत.यामुळे गावात कित्येक कुटुंबाची मुस्कटदाबी सुरु असुन हे किती दिवस चालणार असा सवाल उपस्थित केला जात आहे .
दोन दिवसां पुर्वी नाव गावातील गावपंचायतीने कहरच केला, गावातील विजय भिमराव विचारे वय ३५ हा युवक मुंबई मध्ये अल्पश: आजाराने मयत झाला. मयत विजयची पत्नी, भाऊ, भावजय दोन लहान मुलं बहिण हे कुटुंबीय मुंबई वरुन मयताचे रक्षाविसर्जन विधि व इतर विधि पार पाडणेसाठी आपल्या मुळ गावी दाखल झाले.परंतु गावाने त्या कुटुंबाला यायचे आधिच गावपंचायत बोलाऊन बहिष्कृत केले.मुबई वरुन आलेल्या लोकांनी विनंती करुन सुध्दा गावपंचायत ऐकायला तयार नाही.शेवटी त्या मयत मुलाचे मामा यांनी त्यांचे कोंडावळे गावी सर्व ग्रामस्थ यांना सदरची परीस्थिती समजुन सांगीतली व त्यांनी समजुनही घेतली व रक्षाविसर्जन कार्यक्रम मामाचे गावी कोंडावळे येथे विधिवत पार पाडला.कैलासवाशी विजय विचारे या युवकाच्या रक्षाविसर्जन साठी गाव आले नाही तरी विभागातील लोकांनी व कोंडावळे गावातील संपुर्ण ग्रामस्थ यांनी रक्षाविसर्जन कार्यक्रम विधी उपस्थित राहुन पाडून माणुसकीचे दर्शन घडविले, या धक्कादायक प्रकारामुळे कोयना भागासह पाटण तालुक्यात चुकीचा संदेश जात आहे,
समाजातील सर्व घटकांना समन्यायी समन्वयाने न्याय मिळाला पाहिजे असे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या राज्य घटणेत सांगितलेले जगणेचे स्वतंत्र्य नाव सारख्या अनेक गावपंचायती हिराउन घेत आहेत एवढे मात्र नक्की.