महाराष्ट्र न्यूज मायणी प्रतिनिधी : मंगेश भिसे
अति पाऊसामुळे मागील चार ते पाच दिवसापूर्वी मायणी मल्हारपेठ ते पंढरपूर पर्यायी पूल वाहून गेला होता. तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने रखडलेले काम पुर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मागील चार ते पाच दिवसापूर्वी हा बंद असल्याने व्यापारी , शेतकरी वर्ग तसेच मोटरसायकल स्वार यांच्यावर मोठे संकट उभे राहिले होते परंतु पर्यायी पूलाचे वेळीच काम पुर्ण झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
ह्या पूलावरून दररोज अनेक प्रवाशी प्रवास करत असल्याने मायणी ग्रामथ अनिल जाधव यांनी त्वरीत पर्यायी पूलाचे काम पुर्ण करण्यासाठी मागणी केली होती अनिल जाधव पुढे म्हणाले की संबंधित पूलाची उंची वाढवावी कारण की जर पुन्हा पाऊस आला तर पुन्हा हा पूल वाहून जाण्याची भिती आहे




















