महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/सातारा :
राज्यांतील सरकारी बँका, फायनान्स कंपन्या, पतसंस्था व इतर वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था यांचा अन्यायकारक व मानहानीकारक वागणूक व वसुली करत असल्यामुळे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक कांबळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमर बेंद्रे, सातारा जिल्हा अध्यक्ष सनी भिसे, सातारा जिल्हा कार्य अध्यक्ष आदेश गंगावणे, सातारा जिल्हा सचिव ओंकार घोडके माहिती अधिकार कार्यकर्ते व अध्यक्ष युवा राज्य फाउंडेशन चे महारुद्र तिकुंडे उपस्थित होते.