मोरोपंत सभागृह बारामती याठिकाणी होणार सोडतीचा कार्यक्रम तहसीलदार विजय पाटील यांची माहिती
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / सुनिल निंबाळकर, बारामती :
जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशानुसार सरपंचपदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम दिनांक 29 जानेवारी 2019 रोजी निश्चित केलेला आहे सदर सोडतीच्या वेळी काढलेले आरक्षण हे सन 2021 ते 2025 या मुदतीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी लागू राहील बारामती तालुक्यातील आरक्षण सोडत कार्यक्रम हा दिनांक 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कवी मोरोपंत नाट्यगृह बारामती येथे तहसीलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
सदर आरक्षण सोडतीसाठी तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांना उपस्थित राहण्याबाबत असे आवाहन तहसीलदार विजय पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे तसेच या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरिकांनी व उपस्थित अधिकारी वर्ग यांनी सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करावे
































