महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पाटण
सणबूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कलम 4 अंतर्गत सर्वसामान्य लोकांच्या माहिती साठी असलेली माहिती 15 दिवसांत प्रसिद्ध करावी अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा आरपीआय (आठवलेगट) रोजगार आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत मगरे यांनी पाटण गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनाच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांना देण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,सणबूर ता. पाटण ग्रामपंचायतीने कार्यालयात शासनाच्या विविध योजनेची माहिती पत्रके,लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांची कर्तव्ये यांची गावातील सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावी यासाठी कलम 4 अंतर्गत हि सर्व माहिती कार्यालयाच्या दर्शनी भागात स्पष्टपणे लिहणे अपेक्षित आहे, मात्र सणबूर ग्रामपंचायतींत कलम 4 ची माहिती लिहलेली दिसून येत नाही ,तरी जनतेसाठी खुली केलेली सदर माहीती 15 दिवसांत लिहण्यात यावी ,
या निवेदनावर जयंत मगरे यांच्या सह आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रा रवींद्र सोनावले, पाटण तालुकाध्यक्ष प्राणलाल माने, युथचे अध्यक्ष आनंदराव कांबळे, शहराध्यक्ष दिपक भोळे, शैलेश मगरे, रवींद्र कांबळे व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.






















