महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : पाटण
शंभूराज देसाई यांनी प्रशासकीय मान्यता घेतलेली जलसंपदा विभागाकडील कामे तात्काळ सुरु करा. या कामांमध्ये जलसंपदा विभागाने दिरंगाई करू नये, मुदतीत कामे पूर्ण करा, असे आदेश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जलसंपदा मंत्री पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात पाटण तालुक्यातील जलसंपदा विभागाकडील विविध प्रकल्प कामे यांची आढावा बैठक झाली. अर्थ व गृहराज्यमंत्री देसाई यांनी तारळी मध्यम धरण प्रकल्पातील ५० मीटर उंचीवरील पाच उपसा सिंचन योजनांच्या कामांना गती देणे. मोरणा गुरेघर धरण प्रकल्पातून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून डोंगराकडे च्या जमिनी क्षेत्राला पाणी, कोयना नदी काठच्या नेरळे, गिरेवाडी घाटाच्या कामांची निविदा प्रसिद्ध करणे, बन पेठ, गुंजाळीतील घाटाच्या कामांना निधी देणे. सांगवड घाटाच्या कामांस पाच कोटींच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणे, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, जानुगडेवाडी व शितपवाडी ही चार मराठवाडी प्रकल्पातून वगळण्यात येऊन, त्यांचा समावेश महिंद धरण लाभक्षेत्रात करावा. कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांची तात्काळ नेमणूक करावी अशी मागणी केली. त्यांचे धोरणात्मक निर्णय मंत्री पाटील यांनी घेतले.