सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाडे येथे जनावरांच्या विविध आजारासंदर्भात उपचार आणि मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. मल्हारपेठ च्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुचित्रा माळी, पाटण पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. नाडे, माथनेवाडी, क्रांतीनगर या परिसरातील सुमारे १५० ते २०० शेतकऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेतला.
शिबिर यशस्वी करण्यासाठी पाटण पंचायत समिती सदस्य सुभद्रा शिरवाडकर, नाडे गावचे सरपंच विष्णू पवार, नाडे सोसायटी चे चेअरमन जयवंत पवार, डॉ. विजय देसाई, डॉ. प्रदीप पवार, डॉ. कांबळे, डॉ. वाकणकर, डॉ. यादव, डॉ. मोहिते व बाबुराव पुजारी यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी पांढरवाडी दूध संघाचे चेअरमन सर्जेराव नलवडे, शिवाजी माथणे, तलाठी शिंदे, तसेच पशुवैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.