सातारा : अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथील वेदांत कृष्णात बागल याने इ. ५वी मध्ये सैनिक स्कूल सातारा लेखी परीक्षेमध्ये ३०० पैकी २७० मार्क मिळवून मेरिट लिस्टमध्ये आला. नवोदय परीक्षेमध्ये शहरी भागातून पहिल्याच यादीत स्थान मिळविले तसेच रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी परीक्षेत इ.५ वी मध्ये संस्थेत पहिला आला व ५ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये २८६ पैकी २६६ मार्क मिळवून राज्याच्या यादीत ७ वा तर जिल्ह्यात ५ वा क्रमांक मिळविला . खरं तर त्याच्या या सर्व यशाचे श्रेय राजमुद्रा करियर अकॅडमीला जाते . राजमुद्रा अकॅडमीमधील विकास जगदाळे सर , रुपाली बागल मॕडम , पुजा शिंदे , कांबळे मॕडम, पवार मॕडम यांचे वेळोवेळी खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच हे यश मिळवता आले .
वेदांतच्या यशाबद्दल राजमुद्रा अकॅडमीच्या सर्व स्टाफ ने विशेष अभिनंदन आणि गोड कौतुक केले . पालक कृष्णात बागल , सौ .माधुरी बागल , वरद बागल , प्रा. एस.एन.जाधव , सौ.शोभा जाधव , आनंदराव साबळे आणि सर्व नातेवाईक आणि शाळेतील शिक्षक इतर पालक यांनी त्याचे अभिनंदन आणि गोड कौतुक केले .