साखरवाडी मध्ये एक बैल लंपीने दगावला
फलटण प्रतिनिधी – तालुक्यांतील अनेक ग्रामीण भागात लंम्पी या आजारांने बांधीत जनावरांचे प्रमाण वाढले असून लसीकरण करण्यात तालुका पशुवैद्यकिय अधिकारी व सबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून उपचार,निदान, लसीकरण, मार्गदर्शन याकडे पशुवैद्यकिय विभाग डोळेझाक करत असल्याने तालुक्यात फारच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यात सध्या 159 जनावरे बाधीत असनु 11 जनावरे दगावली आहेत असे असताना देखील तालुका पशुवैद्यकिय विभाग नेहमीसारखा झोपलेल्या आवस्थेत फक्त कागदी घोडे नाचवत आहे असा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.सदर रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता बाहय किटकांवर नियंत्रण, जैव सुरक्षा नियमांचे पालन, निर्जतुंक द्रावणाच्या कीटकनाशकांची परिसरात फवारणी, इत्यादी आवश्यक या बाबीची काळजी घेणे जास्त महत्वाचे असून याबाबत पशुवैद्यकिय विभाग मार्गदर्शन करत नसल्यानें शेतकऱ्यांना खाजगी डॉक्टरांवर अवलंबुन रहावे लागत आहे
फलटण तालुक्यात म्हणावे असे लसीकरांनाला प्रधान्य दिले जात नसल्याने लंम्पी या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करण्यासाठी शेतकर्यांमध्ये प्रचंड मोठी नाराजी असून अनेक गावात लंम्पी बाधित जनावरांवर खाजगी डॉक्टर मार्फत पैसे खर्च करून उपचार करून घ्यावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक विवेचनामुळे चिंताग्रस्त झाला आहे.नावापुरते व कागदावरच काम करणाऱ्या तालुका पशुवैद्यकिय विभागाने कात झटकून काम करण्याची मागणी तालुक्यांतील शेतकरी वर्गातून होत आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या भागासाठी कोण पशू वैद्यकीय डॉक्टर आहे हेच माहित नसल्याने तसेच त्यांचे नाव व संपर्क क्रमांक माहीत नसल्याने संपर्क साधने शक्य होत नाही.
तालुका पशुवैद्यकिय अधिकारी व त्यांचे सहाय्यक डॉक्टर कोणत्याच माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने मार्गदर्शन, लसीकरण, निदान, उपचार याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती शासनाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी अत्यंत काळजीत आहे. एकीकडे प्रशासनाकडून लसीकरण व मार्गदर्शन बाबत उपाययोजना करण्याचे शासनाकडून आदेश होत असताना मात्र फलटण तालुक्यात प्रत्यक्षात कोणतीच पशुवैद्यकीय सेवा ग्रामीण स्तरावर पोहोचत नसल्याचे चिन्ह आहे. फलटण तालुक्यात व ग्रामीण भागात अत्यंत वाईट अवस्था सद्यस्थितीला असून या लवकर बदल न झाल्यास लंम्पी या आजारांने संपूर्ण तालुका बाधित होऊन कोट्यावधीचे शेतकऱ्याचे पशुधनाचे नुकसान होणार आहे.
चौकट
लंम्पी हा आजार होऊ नये म्हणून गोठा व गोठ्याच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ, हवेशीर ठेवावा. गोठ्यामध्ये पाणी साठू देऊ नये.
गोठ्यामध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये माशा, कीटक, गोचीड यांचा प्रादुर्भाव होऊ देऊ नये. प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपाययोजना कराव्या .जनावरांच्या अंगावर कीटक येऊ नयेत यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने बाह्यअंगावर औषधे लावावीत किंवा फवारावीत. बाधित जनावरांचे त्वरित निरोगी जनावरांपासून विलगीकरण करावे.