वरकुटे मलवडी महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी
बिदाल प्रतिनिधी :
ब्रिटिश काळात शेतक-यांची बाजू परखडपणे मांडणारे, महिला, विधवांसाठी काम करणारे फुले एकमेव समाजसुधारक होते.स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा ज्योतिबा फुले यांनी रोवली. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी कठीण परिस्थितीत महिलांना शिक्षण देण्याचे काम केले. महिलांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती, त्यांना शिक्षण घेण्याचे स्वतंत्र नव्हते, अशा काळात त्यांनी आपल्या स्वतःच्या घरात शाळा सुरु करून महिलांना साक्षर केले. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी प्रा. सचिन होनमाने यांनी केली.
वरकुटे मलवडी ता माण येथे क्रातीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांची १३८ वी पुण्यतिथी राष्ट्रीय समाज पक्षाचा वतीने साजरी करण्यात आली. त्या वेळी प्रतिमेचे पुजन करतेवेळी रासपचे माण खटाव विधानसभा अध्यक्ष प्रा. सचिन होनमाने शांताराम जाधव,सागर बनगर,साहेबराव खरात, बियांत जगताप, साहिल तांबोळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी होनमाने म्हणाले महात्मा फुले यांनी लिहिलेल्या ‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. स्त्री व पुरुष यांच्यात भेदभाव न करता सर्वांनी एका कुटुंबाप्रमाणे, एकमताने सत्यवर्तन करून राहिले पाहिजे, असे त्यांचे विचार होते, असे होनमाने म्हणाले.
































