महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा अंतर्गत रेडणी तालुका इंदापूर येथे ग्रामीण कृषी जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत किड ओळख, किड नियंत्रण आणि औषध फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयांवर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली .यापार्श्वभूमीवर डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्नित समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी गणेश हरिचंद्र काळे यांनी येथील शेतकरी यांच्या शेतात जाऊन किड ओळख, किड नियंत्रण आणि औषधे फवारताना घ्यावयाची काळजी या विषयांवर मार्गदर्शन केले.
सदर मार्गदर्शन करीत असताना मका पिकावरील लष्करी आळी या किडीची ओळख आणि लक्षणे समजून सांगण्यात आली त्यासाठी घ्यावयाची काळजी आणि प्रतिबंधात्मक उपायोजना याबद्दल सविस्तर माहिती सांगण्यात आली.कीडनियंत्रण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन या पद्धतीने कीडनियंत्रण करण्यास सांगितले त्या ठिकाणी लष्करी आळी ची ओळख तिच्या खाण्याच्या सवयी आणि किडीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी फेरोमेन ट्रॅप इन्स्टॉलेशन करण्यास सांगितले एकरी सहा ते आठ ट्रॅप वापरण्यास सांगितले सोबतच कीटकनाशक आणि तन नाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी फवारणी करीत असताना तोंडाला रुमाल हाताला हात मोजे इत्यादी गोष्टींचा वापर करण्यास सांगितले व काळजी न घेतल्यास होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.
सदर प्रात्यक्षिकेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक राजपूत सर, प्राचार्य नितीन म्हेत्रै व कीटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक विलास चव्हाण सर यांचे योग्य मार्गदर्शन लाभले यावेळी कृषिदूत गणेश हरिचंद्र काळे आणि शेतकरी सचिन तरंगे सर, विठ्ठल काळे, रणजीत तरंगे, महादेव तरंगे आदी उपस्थित होते.