खंडाळा तालुक्यातील पाडळी गावात विविध विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आले. महादेव मंदिर येथे घाट आणि खंडोबा मंदिरे ते ग्रामपंचायत पर्यंत बंदिस्त गटर काम तसेच नवीन अंगणवाडी बांधकाम या तिन्ही कामांचे काल भूमीपूजन करण्यात आले. या भूमीपूजन प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती राजेंद्र तांबे तसेच पंचायत समिती उपसभापती श्रीमंती. वंदना ताई धायगुडे पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याच्या हस्ते नारळ फोडून विकास कामांना सुरूवात करण्यात आली.
यावेळी गावातील सरपंच सौ. स्वाती राहुल ठोंबरे , उपसरपंच दिपक रामचंद्र धायगुडे पाटील, पाडळी गावचे ग्रामसेवक मल्हारी शेळके, जेष्ठ नेते तात्यासाहेब धायगुडे पाटील, विश्वास धायगुडे पाटील रामचंद्र धायगुडे, विकास धायगुडे, पोपट धायगुडे, शिवाजी वाघमारे, संतोष जाधव, सागर गावडे, सचिन निकम, सचिन धायगुडे, किशोर दिक्षित, नागेश्वर ननावरे, भिमराव बोराटे, दादा धायगुडे, सतिश धायगुडे, निलेश वाघमारे इतर ग्रामस्थ उपस्थित होते. आभार तात्या साहेब धायगुडे यांनी मानले.