
या स्पर्धेत प्रथम क्रमांक हा दोन मुलींनी पटकविल्याने तो विभागून देण्यात आला.याचे मानकरी शर्वरी विजयकुमार काटकर व आकांक्षा विठ्ठल वायदंडे ह्या दोन विद्यार्थ्यांनी आहेत.द्वितीय क्रमांकाचा मानकरी गोरक्षनाथ भागवत काशिद हा विद्यार्थी आहे तर तृतीय क्रमांक शिवानी विष्णू पिसाळ ह्या विद्यार्थ्यांनीने पटकाविला आहे.या विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे ,स्मार्ट प्रशस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
ही प्रश्नमंजुषा स्पर्धा ऑफलाईन पध्द्तीने घेण्यात आली होती. यात ५०%च्या वरती गुण मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा सहभागाची प्रशस्तीपत्रक देण्यातआली.हा बक्षिस वितरण सोहळा लोधवडे प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजकुमार माने,सदस्या अश्विनी मगर ,शिक्षक दिपक कदम ,सतेशकुमार माळवे,संतराम पवार, सुचिता माळवे, दीपाली फरांदे, अश्विनी मगर या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते ते वितरित केले.सतेशकुमार माळवे सरांच्या शिवजयंती निमित्तआयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले.यामध्ये माण तालुका पंचायत समिती गट विकासाधिकारी सर्जेराव पाटील,खटाव पं.स.सहाय्यक गटविकासाधिकारी भरत चौगले,नुतन ग.शि.माणिक राऊत,विस्ताराधिकारी रमेश गंबरे,सोनाली विभूते, संगीता गायकवाड,केंद्रप्रमुख नारायण आवळे,मुख्याध्यापक दिपक ढोक, लोधवडेचे सरपंच आप्पासो जाधव, उपसरपंच वैशाली देशमुख व सर्व ग्राम पंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामस्थ व पालकवर्गाकडून सध्या या उपक्रमाचे जोरदारअभिनंदन करण्यात येत आहे.




























