पाटण : माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर व युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती पाटण प्रगतीपथावर असून कोविड 19 या महामारीत योग्य ती खबरदारी घेत तसेच कोविड 19 चे सर्व नियम पाळून शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्याकरता समितीने मुख्य बाजार आवार पाटण याठिकाणी 1 मे या महाराष्ट्र दिनी आंबा कैरी, कोकम, व बेलफळ या शेत मालाचा खरेदी विक्रीचा जाहीर लिलाव पध्दतीचा शुभारंभ करण्यात आला
यावेळी पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती रेखाताई पाटील, उपसभापती अभिजीत जाधव व ज्येष्ठ संचालक जे. व्ही. जाधव उपस्थित होते. आंबा कैरीचा दर सरासरी 10 किलोचा कमीत कमी 80 ते 150 रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत जाहीर लिलावाने कैरी आंब्याचा लिलाव होत असून या अगोदर भाजीपाला सौदे सुरू आहेत. मानेगाव व तारळे याठिकाणी मे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे पेट्रोल पंप कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मल्हारपेठ याठिकाणी 1 हजार मेट्रीक टन क्षमतेचे गोडावूनचे बांधकाम प्रगती पथावर आहे. तरी महाराष्ट्र शासनाच्या पणन व कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत राबविण्यात येणारया कर्ज योजनेचा व इतर सवलतींचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन सभापती रेखाताई पाटील यांनी केले.यावेळी व्यापारी प्रतिनिधी कोयना ऍग्रो पाटण, चोरडिया फ्रुट, प्रवीण मसाले (शिरवळ), असुवरा (सातारा), बावडेकर (कराड), आनंद मसाले (कराड), अश्विनी मसाले (कराड), लोखंडे (कडेगाव), निखील (तासगाव), आर. ए. मसाले (सांगली), चारमिनार (सांगली), सिध्दीविनायक (कोल्हापूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), ए. वन (तासगाव), गणेश मसाले (सातारा), मनियार (नगर) आदी लोणचेवाले उपस्थित होते.































