विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन होणार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत
सातारा : खोडजाईवाडी (किवळ) ता. कराड येथील साठवण तलावाचे भूसंपादन निधीचे वितरण व विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन समारंभ विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते तर सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दि. 30 जानेवारी रोजी 4 वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास मृद, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दिपक चव्हाण, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील व पदवीधर मतदारसंघातून सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार अरुण लाड यांचा नागरी सत्कारही करण्यात येणार आहे.
































