जनतेचे प्रश्न साेडविण्यात असमर्थ ठरलेल्या नगराध्यक्षांविराेधात जिल्ह्याधिकाऱ्यांकडे तक्रार
काेरेगांव नगरपंचायतीच्या दूषीत पाण्याच्या प्रश्नाने आता वेगळेच वळण घेतले असून पाण्यासाठी आंदाेलन करणाऱ्या नागरिकांविराेधातच चक्क नगराध्यक्षांनी पाेलीसात गुन्हे नाेंदविल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे.
बुधवारी 9 सप्टेंबरला काेरेगांव शहरात सुरु असलेल्या दूषीत पाण्याचे निविदेन घेवून शहरातील नागरिकांसह साेनेरी ग्रुपचे काही सदस्य नगरपंचायत कार्यालयात गेले हाेते. त्यांचे निवेदन स्विकारण्यास नगराध्यक्ष अथवा काेणीच सदस्य बराच वेळ येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी नगराध्यक्षांच्या दालनात प्रतिकात्मक महाळ घालून दूषीत पाण्याने मृत पावलेल्या काेरेगांव मधील नागरिकांना श्रध्दांजली वाहिली हाेती. यावेळी नगरपंचायतीत नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी निवेदन घेऊन आलेल्या नागरिकांशी चर्चा करुन दाेन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी संबंधीत विभागप्रमुख, अभियंत्यांवर ताषेरे ओढून दूषीत पाणी का दिले जाते याची माहिती घेतली, त्यावेळी गेली नऊ महिने तुरटी, ब्लिचींग ठेकेदाराचे खरेदी बिल आदा न केल्याने संबंधीतांनी पुरवठा बंद केला आहे, गेली पंधरा दिवस तुरटी, ब्लिचींग न वापरताच पाणी पुरवठा सुरु असल्याचा प्रकार यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला.
आंदाेलकांना मुख्याधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे देवून पाणीपुरवठ्यात यापुढे निश्चित बदल करु, एमआयडीसी ि\ल्टरेशन प्लँट दुरुस्तीच्या निविदा प्रक्रिया तात्काळ सुरु करु, रेल्वे स्टेशन पंप हाऊसचे उर्वरीत काम लवकर सुरु करु अशी ग्वाही दिली. मात्र नागरिक घेवून आलेले निवेदन न स्विकारता उलट तक्रार घेवून आलेल्या नागरिकांवरच नगराध्यक्षा रेश्मा काेकरे यांनी काेरेगांव पाेलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 188, 500 प्रमाणे बुधवार दि. 9 राेजी एकूण तेरा जणांवर गुन्हे दाखल केले. यात साेनेरी ग्रुपचे अध्यक्ष संताेष नलावडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजित बर्गे, काेरेगांव युथ फाउण्डेशन कार्याध्यक्ष अमर देशमुख, डेकाेरेटर्स संघटनेचे सुरज पवार यांच्यासह तेरा जणांचा समावेश आहे.
काेरेगांव शहरात गेली वर्षभर दूषीत पाण्यासाठी संघर्ष सुरु असून नागरिकांनी वेळाेवेळी तक्रार देवूनही नगरपंचायतीच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. नगरपंचायतीचा ि\ल्टरेशन प्लँट दुरुस्त करावा याठी साेनेरी ग्रुपच्या वतीने नगरपंचायतीसह, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी यांना 19 मे, 26 मे, 16 जुलै, 21 ऑगस्ट, 9 सप्टेंबर अशी वेळाेवेळी निवेदने देवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 27 मे राेजी नागरिकांनी नगरपंचायतीला घेरावही घातला हाेता. त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने आंदाेलकांना 15 जुलै पर्यंतची वेळ मागत ि\ल्टरेशन प्लँट दुरुस्तीची लेखी ग्वाही सुध्दा दिली हाेती, गेली वर्षभर काेरेगांवकर दूषीत पाणी पित असून यामुळे शहरातील अनेक नागरिकांचे आराेग्याचे प्रश्न निर्माण झाले. मात्र या महत्वपूर्ण प्रश्नाकडे नगरपंचायतीने साेईस्कर दूर्लक्ष केले. पाण्याची समस्या साेडविण्याऐवजी नकाे त्या गाेष्टीत स्वारस्य दाखविणाऱ्या पदाधिकाऱ्यानी नागरिकांच्या निवेदनाला न जुमानता नगरपंचायतीत गैरहजर राहण्याचा व कामकाज पतींच्या हस्तक्षेपाने चालविण्याचा प्रकार सुरु ठेवला हाेता. नेमका ताेच प्रकार 9 सप्टेंबरला झाला. पाण्यासाठी नागरिक निवेदन घेवून आलेले असताना त्यांना सामाेरे जाण्याऐवजी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा लाजीरवाणा प्रयत्न काेरेगांव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रेश्मा काेकरे यांनी केला असून या प्रकाराविराेधात जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे आम्ही तक्रार नाेंदविली असून साेमवारी प्रत्यक्ष भेटून नगरपंचायतीत सुरु असलेल्या गलथान कारभाराची व पती हस्तक्षेपाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याचे साेनेरी ग्रुपचे अध्यक्ष संताेष नलावडे व अजित बर्गे यांनी दिली आहे.