महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
मा .खासदार श्री.शरदचंद्रजी पवार यांची माण खटाव मतदारसंघात धावती भेट देत असताना मा.श्री.प्रभाकरजी देशमुख यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी द्यावी असे विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे दहिवड़ी नगरपंचायत माजी नगरसेवक सुरेंद्र मोरे यांनी केली देशमुख साहेब यांचे सारखे नेतृत्व मिळाल्यास माण आणि खटाव तालुक्यातील जनतेस नक्की न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली.

तसेच गुंठेवारी बंदी कायदा रद्द करावा कारण दुष्काळी भागातील शेतकरी आर्थिक अडचणी मुळे काही गुंठे शेत जमीन खरेदी विक्री करताना गुंठे बंदी नियमांमुळेअनेक अडचणी येत आहेत तसेच जमीन खरेदी करताशेतकरी असल्याचा पुराव्याची अट शिथिल करावी असे निवेदन मोरे यांनी मा. शरद पवार यांना त्यांच्या दौऱ्यावेळी दिले.






















