माण देशी फौंडेशन च्या माध्यमातून आणि बेल एयर हॉस्पिटल यांच्या मदतीने दि. 24/ 08 / 2021 पासून सातारा येथे स्वराज मंगल कार्यालयात महिलांसाठी मोफत लसीकरण शिबिर चालू करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्याचे खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील यांनी भेट दिली.
यावेळी ते बोलताना माणदेशीच्या संस्कृतीचे व चेतना सिन्हा याच्या कार्याचे कौतुक केले, तसेच लसीकरणाच्या वेळी इतर ठिकाणी होणार गोधळ व त्यासाठी लागणारी पोलिसांची टीम या सर्वाचे वेगळेपण म्हणजे माणदेशी मध्ये होणारे शिस्तबध लसीकरण कौतुकास्पद वाटले तसेच स्वच्छता, संस्कृती, प्रेरणा आणि चेतना याचा एकत्रित मिलाप अनुभवन्यास मिळाला. लसीकरण देवून माणदेशी ने महिला ना विना ताण, मान दिला.
तसेच माणदेशी फौंडेशन व बँकेच्या अध्यक्ष श्रीमती चेतना सिन्हा असे म्हणाल्या की लसीकरणाची सुरुवात माण तालुक्यापासून करून आज सातारा जिल्हातील +6000 महिलांना लसीकरण करणार असल्याचे सांगितले. कुठलीही महिला लसीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेऊन अजून लस वाढवता येतील का याचे नियोजन माणदेशी करत आहे. आतापर्यंत 20000 महिलांना लसीकरण झाले आहे व एकूण 25000 महिलांना लसीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तिसऱ्या दिवशी साताऱ्यातील २००० महिलांनी लसीकारणासाठी दिलेला प्रचंड प्रतिसाद पाहून त्याचे मन भारावुन गेले.
पहिल्या टप्प्यात 6000 महिलांचे मोफत लसीकरण स्वराज मंगल कार्यालयात चालू आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात 4000 महिलांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. खेडेगावातून लस घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना माणदेशीने बस ची सोय केलेली आहे. याठिकाणी आलेल्या प्रत्येक महिलेला केळी, समोसा, असा नाष्टा दिला जातो, त्याबरोबर पाण्याची बॉटल ही दिली जाते. बसण्यासाठी अंतर ठेवून खुर्ची ची सोय करण्यात आली आहे.लस घेतल्यांनातर चहा ,बिस्कीट दिले जाते. कोणाला बी.पी/शुगर चेक करणे किंवा आरोग्यविषयक सल्ला देण्यासाठी 2 डॉक्टर आहेत. महिलांना योगा चे प्रशिक्षण देण्यासाठी योगा कोच आहेत .लस घेतल्यानंतर फोटो घेण्यासाठी सेल्फी पॉईंट आहेत.
माण देशी फौंडेशन ने आत्तापर्यंत म्हसवड , दहिवडी , वडूज , लोणंद याठिकाणी +15,000 महिलांचे मोफत लसीकरण केले आहे. आणि पुढेही येथे दुसऱ्या डोस साठी महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या डोस साठी एकूण 25,000 महिलांचे लसीकरण करण्याचा माण देशी फौंडेशन चा निर्धार आहे. हा कोविशिल्ड लसीचा पहिला डोस आहे.
या वेळी माण देशी फौंडेशन आणि बँकेच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा , माण देशी बँकेच्या CEO रेखा कुलकर्णी, माणदेशी फौंडेशन च्या CAO वनिता शिंदे , माण देशी फौंडेशन सातारा च्या कोर्डिनेटर अपर्णा सावंत , माणदेशी महिला बँक सातारा च्या शाखाधिकारी रेश्मा काटकर व माणदेशी बँक व फौंडेशन चा सर्वच स्टाप उपस्थित होता.
लस सुरक्षित आहे.
आम्ही लस घेतलेली आहे तुम्हीही घ्या.
आपण सुरक्षित तर देश सुरक्षित.