ना. रामराजे नाईक निंबाळकर व तात्यासाहेब काळे यांची यशस्वी शिष्टाई , कामगारांमध्ये चैतन्य….
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/फलटण : साखरवाडी येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यांमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षांपासून संकलित म्हणून काम करणाऱ्या सुमारे १३२ जणांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी न पाहता ना रामराजे नाईक निंबाळकर,तात्यासाहेब काळे(अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळ),कारखाना व्यवस्थापन व युनियन पदाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीमध्ये पूर्ण वेतन वाढ देण्याचे ठरले असून यामुळे कामगारांनी फटाके व पेढे वाटून आनंद साजरा केला व ना रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुष्पहार घालून आभार मानले. पूर्वाश्रमीचा बंद पडलेला न्यू फलटण शुगर वर्क्स लिमिटेड हा साखर कारखाना मागील वर्षी एन सी एल टी न्यायालयाच्या माध्यमातून सांगलीच्या श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विकत घेतला व मागील उसाचा हंगाम व गत वर्षी सुरू असलेला उसाचा हंगाम अतिशय उत्साहात व पूर्ण क्षमतेने गाळप करून आपल्या कार्यकर्तृत्वाची चुणूक परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना दाखवून दिली यामध्ये वेळचे वेळेवर उसाची बिले व कामगारांचे पगार अतिशय चोख व वेळेवर करून वर्षभरातच दत्त इंडिया कंपनीने शेतकरी व कामगार यांचा विश्वास संपादन केला असून मागील दहा ते पंधरा वर्षापासून संकलित म्हणून तुटपुंज्या सहा ते सात हजार रुपये मानधनावर काम करणाऱ्या सुमारे १३२ कामगारांना पूर्ण वेतनवाढ हा ऐतिहासिक निर्णय व्यवस्थापनाने घेतला असून यामुळे कामगारांमध्ये प्रचंड चैतन्याचे वातावरण असून भविष्यातही साखरवाडीच्या वैभवात भर घालून व आजूबाजूच्या परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात श्रीदत्त इंडिया ही कंपनी मागे राहणार नाही असे व्यवस्थापनाने यावेळी बोलताना सांगितले.यावेळी झालेल्या बैठकीत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,श्री दत्त चे संचालक जितेंद्र धारू,प्रीती रुपारेल,परीक्षित रुपारेल कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी अजित जगताप,कामगार युनियनचे राजेंद्र भोसले,पोपट भोसले,गोरख भोसले,बाळासो भोसले,संजय जाधव,राजेंद्र गायकवाड,संतोष भोसले,महेश भोसले,निवृत्ती भोसले , महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळ,फलटण तालुका साखर कामगार युनियन व सर कौन्सिल मेंबर उपस्थित होते व या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सर्वांनी ना रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुष्पहार घालून आभार मानले.