वडगाव निंबाळकर येथे लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती कोरोना पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी
संतोष भोसले
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी वडगाव निंबाळकर प्रतिनिधी संतोष भोसले
लोकशाहीर , साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची आज 100 वी जयंती आहे. येथील नागरिक दरवर्षी आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनचे पालन करत जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. साठेनगर येथे वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे याच्या हस्ते आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले. यावेळी बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष नानासाहेब मदने, तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड, सचिव आकाश वाघमारे, आण्णाभाऊ साठे युवा संघटनेचे अध्यक्ष संजय खुडे, अंकुश खुडे, दत्ता घोलप, मनोज घोलप, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर सानप, विठ्ठल कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल गायकवाड यांनी केले तर आभार संजय खुडे यांनी मानले.